…तर शरद पवार पंतप्रधान बनण्यासाठी तयार, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा !

…तर शरद पवार पंतप्रधान बनण्यासाठी तयार, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पंतप्रधानपदासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यानं बॅटींग करण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार स्वतः पंतप्रधान बनायला तयार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांनी केलं आहे. एनडीए वगळता इतर पक्षांचे नेते तयार असतील तर पवार पंतप्रधान बनायला तयार आहेत. असा दावा मेमन यांनी केला आहे.

दरम्याम देशात एनडीएचं सरकार बनू नये असा सगळ्या विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे. तसेच आपण पंतप्रधान बनण्याच्या शर्यतीत नसल्याचे विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यापूर्वीच केलं असल्याचाही दावा मेमन यांनी केला आहे. त्यामुळे आघाडीचं सरकार आलं तर मेमन यांनी केलेल्या दाव्यानंतर सर्व विरोधी पक्ष शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS