भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण हे बाहेरच्या लोकांनी घडवलं असून त्या बाहेरच्या लोकांना सरकारने शोधावे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे. अकलूजमध्ये घेण्यात आलेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच त्यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली आहे.
तसेच राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आणि व्यथाही शरद पवारांनी त्यांच्या भाषणात मांडली. आम्ही पिकवणाऱ्यांचा विचार करतो आणि सरकार खाणाऱ्यांचा विचार करते आहे. सरकारने आता त्यांचे धोरण बदलण्याची गरज आहे. पिकवणारा जगला तर खाणारा जगेल ही गोष्ट सरकारने लक्षात घेतली पाहिजे असंही अकलूजमधील सभेत पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS