तेरणा साखर कारखाना सुरु करण्याचे प्रयत्न – सुभाष देशमुख

तेरणा साखर कारखाना सुरु करण्याचे प्रयत्न – सुभाष देशमुख

उस्मानाबाद – राज्यातील  पुढील  वर्षाचा उस गाळपाचा प्रश्न मिटवण्यासाठी बंद पडलेले १० साखर कारखाने सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचं वक्तव्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. यामध्ये उस्मानाबादमधील तेरणा कारखाना देखील सुरु केला जाणार असल्याचं आश्वासन देशमुख यांनी दिलं आहे. त्यामुळे तेरणा साखर कारखान्याच्या शेजारील शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तसेच कसबे तडवळे येथील  एस. पी. सुगर या कारखान्याचा प्रथम हंगा रविवारी सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यासह राज्यात सात वर्षानंतर चांगला पाऊस झाला असल्यामुळे उस उत्पादनातही मोठी वाढ होत आहे. यासाठी उसाच्या गाळपाचा संभाव्य प्रश्न सोडवण्यासाठी आतापासूनच प्रयत्न केले जात असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बंद पडलेला तेरणा कारखाना आता सुरु होणार असल्याचं दिसत आहे. हा कारखाना सुरु झाला तर उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

COMMENTS