कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे आज कोल्हापूरच्या दौ-यावर आहेत. यादरम्यान पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महत्वाचे प्रश्न देशासमोर उभे आहेत. जे कार्यक्रम जाहीर केली होती.ती पुर्ण केली नाहीत. देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली असून अविचारी निर्णयाचे दुष्परिणाम देशात दिसू लागले असल्याचं पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान सरकारने मल्टी नॅशनल कंपनीसाठी पायघड्या घातल्या असून नियम शिथील केले आहे. यामध्ये व्यापारी आणि छोटा व्यवसायिक अडचणीत आला असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच या राज्यकर्त्याच्याबाबत प्रचंड असंतोष असून लोकांचा असंतोष मतपेटीमधुन व्यक्त होणार आहे. आम्ही एक आघाडी करतोय हे खर नाही. आम्ही देशाच्या पातळीवर एक काहीतरी करतोय अस नाही. तर राज्याराज्यातील परिस्थितीनुसार आघाडी करत आहोत.
तसेच राज्यात असणाऱ्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला पाहिजे. हे सुत्र स्वीकारले तर भाजपाला बाजूला करता येईल असंही यावेळी पवार यांनी म्हटलं आहे. ऱाज्या राज्यात एकत्र बसुन निर्णय घेतला तर फायदा होणार आहे. दिल्लीध्ये १० डिसेंबरला आम्ही सगळे एकत्र बसतोय. सत्ताधारी नेते दोनच भूमिका घेत आहेत. एक धर्म आणि दुसरे काँग्रेस कुटुंब त्यांच्याकडे सांगायला काही नाही म्हणून हे दोनच मुद्दे मांडत आहेत.
शिवसेना अयोध्येमधे कशासाठी चालली आहे.यांच्याकडे लोकांना सांगायला काही नाही म्हणून ते धर्माच्या नावावर लोकांना आपल्याकडे वळवीण्याचा प्रयत्न करत आहेत. एकदा राम मंदिराचा विषय यशस्वी झाला म्हणजे सारखा हा विषय यशस्वी होईल असं नाही. असंही यावेळी पवार यांनी म्हटलं आहे.
जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी नॅशनल कॉन्फर्नस एकत्र आले. ऱाज्यपालांची जबाबदारी होती त्यांना संधी द्यायची. पण राज्यपाल यांनी चुकीची भूमिका घेतली. ऱाज्यपाल यांच्या या भूमिकेचे आम्ही निषेध करतो असंही यावेळी पवार यांनी म्हटलं आहे.ऱाष्ट्राचा विचार न करता; एका पक्षाचा विचार करून राज्यपाल यांनी चुकीची गोस्ट केली आहे.जगात कुठेही एव्हीएम मशिन वापरल्या जात नाहीत; मग देशातच एव्हीएम मशीन वापरण्याचा अट्टाहास का ? असा सवालही यावेळी पवार यांनी केला आहे.
आम्हीच नाही तर भाजपा विरोधी सगळे पक्ष याला विरोध करत आहोत. आम्ही १० डिसेंबरच्या बैठकीत याबाबत चर्चा करणार आहोत. तसेच मराठा आरक्षणावरही यावेळी पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणाचतरी काढुन घेवून कुणालातरी देण्याचं पाऊल टाकलं जात असल्याचा संशय आहे. सरकारची भूमिका आयोग्य साफ नसल्याचंही यावेळी पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS