काँग्रेसनं काय आहे ते सरळ सांगावं, रडीचा डाव आम्हाला पसंत नाही –शरद पवार

काँग्रेसनं काय आहे ते सरळ सांगावं, रडीचा डाव आम्हाला पसंत नाही –शरद पवार

पुणे – काँग्रेसनं काय आहे ते सरळ सांगावं रडीचा डाव आम्हाला पसंत नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. राज्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांची तयारी सुरू असून मित्रपक्ष काँग्रेससोबत राष्ट्रवादीला निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे काय आहे ते त्यांनी सांगावं असं पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या जागा आम्हीच लढवणार आहोत. याला दुसरा पर्याय नाही नसल्याचंही पवारांनी म्हटलं आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार बोलत होते.

दरम्यान राज्यात होणाऱ्या तीन पोटनिवडणुकांबाबत मित्रपक्षांशी बोलून निर्णय घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने रिक्त झालेल्या सांगलीच्या जागेचा विचार करावा लागाणार आहे. तसेच लातूर, उस्मानाबाद, बीडची जागा आमची होती, ती देखील आमचीच असं स्पष्टीकरणही पवार यांनी दिलं आहे. तसेच माझा आनंदाचा काळ हा विरोधात असतानाचा आहे. विरोधात असताना नागरिकांमध्ये जाता येते, त्यांचे प्रश्न समजून घेता येतात असंही पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

 

COMMENTS