बातम्या भीती निर्माण करणार्‍या नको,  दिलासा आणि आत्मविश्वास वाढवणार्‍या हव्यात- शरद पवार

बातम्या भीती निर्माण करणार्‍या नको, दिलासा आणि आत्मविश्वास वाढवणार्‍या हव्यात- शरद पवार

मुंबई – आज आपल्यावर संकट आले आहे. या संकटासंबंधी निगेटिव्ह विचार सोडून देऊया. त्याचा सामना करणार आहोत त्यात यशस्वी होणार आहोत ही स्थिती निर्माण करूया. लोकांचा आत्मविश्वास वाढवूया आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी जे जे प्रयत्न करणार आहोत ते कसे समाजासमोर येतील काळजी घेवूया म्हणून बातम्या भीती निर्माण करणार्‍या नको.बातम्या दिलासा आणि आत्मविश्वास वाढवणार्‍या हव्यात यातून उपयुक्त घडेल अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांना केली. आज पुन्हा एकदा शरद पवार यांनी सोशल माध्यमातून देशातील व राज्यातील जनतेशी संवाद साधला.

जनतेशी संवाद साधताना पालघरमध्ये घडलेल्या घटनेवरही शरद पवार यांनी भाष्य केले.
काही दिवसात राज्यात उदाहरणे घडली. काही नसताना राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे भासवलं जातंय. पालघरला जो प्रकार घडला त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे व चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रथमदर्शनी १०० पेक्षा जास्त लोकांना अटक करून तुरुंगात टाकले आहे. हा प्रकार घडल्यानंतर काही तासातच राज्यसरकार व पोलिस यांनी खबरदारी घेतली. जे घडलं ते चांगलं नाही. घडायला नको होते. असा प्रकार गैरसमजातून घडल्यानंतर लगेचच राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी होते हे योग्य नाही. ही वेळ नाही. जे आज कोरोनाचे संकट त्यावर मात करण्यासाठी एकजुटीने, एका विचाराने तोंड देण्याची गरज आहे. काही ठिकाणी संघर्ष असतो तो करायचा त्यावेळी करू परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे. ही वेळ नाही.म्हणून असं एखाददुसरं प्रकरण घडलं. हे घडायला नको होते ते निषेधार्ह आहे पण हे घडलं म्हणून आज ज्या संकटाशी संघर्ष करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यात शिथीलता येणार नाही याची काळजी घ्या असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

जगात कोरोनाने थैमान घातले आहे त्याचे दुष्परिणाम मृत्यूमध्ये दिसत आहेत. अमेरिकेसारखा जगातील धनिक, संशोधन, आरोग्य यात अतिशय उत्तम सुविधा असलेला, चांगली घरे आणि दोन घरात अंतर असलेला देश अशी परिस्थिती असताना कालपर्यंत अमेरिकेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या ४० हजार ६८३ इतकी आहे तर इटलीत २३ हजार ६००, स्पेनमध्ये २० हजार ८५२, फ्रान्समध्ये १९ हजार ७१८ आहे. या देशांची साईज महाराष्ट्राच्या जवळपास आहे मात्र महाराष्ट्रातील मृत्यूमुखी संख्या ही चिंतनीय आहे. भारताची लोकसंख्या सर्वांना माहित आहे. ती सांगायला नको. परंतु कोरोनाने मृत्यू ५९० आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर २२३ असून देशाच्या तुलनेत जास्त आहे. इटलीत २३ हजार ६०० तर त्याच्यापेक्षा मोठ्या महाराष्ट्रात २२३ मृत्यूदर आहे. परंतु हा आकडा आपल्यासाठी चिंतनीय आहे. या देशांशी तुलना नाही हा आकडा धक्कादायक आहे असेही शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण – डोंबिवली या शहरात कोरोनाची संख्या लक्षात घेतली तर हे थांबवायचे कसे यासाठी कठोर अंमलबजावणी करून परिस्थितीवर मात करणार व मृत्यूचा दर शून्यावर आणणारच हे ठरवलं तर हे घडू शकते असे स्पष्ट करतानाच महाराष्ट्रात खबरदारी घ्यायची आहे. दर कमी केला तर अनेक गोष्टी घडवू शकतो. देशामध्ये महाराष्ट्राची गोष्ट चिंतनीय आहे. या सगळ्याला संसर्ग महत्वाचे कारण आहे. दोन व्यक्तींमधील अंतर ठेवण्याची सूचना पाळत नाही त्याचा परिणाम जिथे कोरोना नाही तिथेही दिसत आहे. त्यामुळे घराबाहेर पडू नका. या सगळ्या गोष्टींचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. यातून बाहेर पडायचा विचार करायला हवा असेही शरद पवार यांनी सांगितले.

आज पोलीस दल, डॉक्टर्स, नर्सेस व त्यांचे सहकारी, शासकीय यंत्रणेतील लोकं जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी काम करत आहेत. देशाची, राज्याची स्थिती सावरायची आहे. मदतीला यायचं आहे. त्यांच्याविषयी आत्मियता दाखवली पाहिजे कर्मचार्‍यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा, त्यांच्या कुटुंबीयांची काळजी न वाढेल याची खबरदारी आपण घेवूया म्हणून या सर्व कामात आपल्या पॉझिटिव्ह अप्रोच यावर्गाबाबत घेणं. त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणं, विश्वास देणं, आम्ही सदैव तुमच्यासोबत व पाठीशी आहोत ही भावना वाढीला लावूया असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

राज्यसरकारच्या प्रशासन यंत्रणेबद्दल बोलताना शरद पवार यांनी मनात विश्वास असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात संघर्ष, संकटे आली त्यावेळी शरद पवारांकडे राज्याची धुरा होती त्यावेळचा प्रसंग त्यांनी इथे सांगितला. लातूरचा भूकंप, मुंबईची दंगल, बॉम्बस्फोट असो. या सगळ्या कालखंडात प्रशासन यंत्रणेने परिस्थिती नॉर्मल करण्यासाठी अक्षरशः काही ताससुध्दा लावले नाहीत. हे कर्तृत्व महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणा व पोलिस यांनी यापूर्वी दाखवले आहे हा इतिहास आहे आणि त्यामुळे या सगळ्यांचा परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यांच्या पाठीशी उभे राहुया असे आवाहनही शरद पवार यांनी देशातील व राज्यातील जनतेला केले.

चार – पाच दिवसाने मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू होत आहे. यावेळेला नेहमीच्या भूमिकेत बदल करावा लागेल. लॉकडाऊनच्या काळात घरातच नमाज आणि रोजा सोडवावा. अल्ला, ईश्वराकडे या महामारीतून बाहेर काढण्याची प्रार्थना करा.सरकारच्यावतीने नमाज बाहेर पडायला परवानगी दिलेली नाही. तुम्ही जसे देशाला योगदान देत आहात तसे योगदान यावेळी घरातच नमाज अदा करुन आणि रोजा सोडून द्यावे अशी विनंती शरद पवार यांनी मुस्लिम बांधवांना केली आहे.

२१ एप्रिल या दिवसाचे स्मरण करताना शरद पवार यांनी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांनी देशातील एक सिव्हिल सर्व्हिस प्रशासकांची पहिली बॅच बाहेर पडल्यावर मार्गदर्शन केले होते तो हा दिवस. सरदार वल्लभाई पटेल यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिशा दाखवली. त्यांच्याबद्दलचा आत्मविश्वास व्यक्त केला. तो दिवस साजरा करण्याचा प्रघात आजही पाळला जात आहे. सरदार पटेलांचा विचार, संदेश प्रशासकीय यंत्रणेने तेव्हापासून दिलाय तो विचार आजही पहायला मिळतो आहे. आजच्या पिढीच्या मनात आहे त्याबद्दल अभिनंदन करतानाच ते कष्ट घेत आहेत त्याबद्दल शरद पवारांनी कृतज्ञता व्यक्त केली.

COMMENTS