सातारा – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुन्हा एकदा ईव्हीएम मशीनबाबत चिंता व्यक्त केली आहे.
त्यांनी त्यांचा एक अनुभव सांगितला असून घड्याळाचं बटण दाबल्यानंतरही कमळाला मत गेल्याचं मी डोळ्यानं पाहिलं आहे. हैदराबाद आणि गुजरात या ठिकाणची काही ईव्हीएम मशीन लोकांनी माझ्यासमोर ठेवली आणि मला बटण दाबण्यास सांगितलं. मी घड्याळासमोरचं बटण दाबलं आणि कमळाला मत गेलं. हा प्रकार मी माझ्या डोळ्यानं पाहिला असल्याचं पवार यांनी साताऱ्यात म्हटलं आहे.
दरम्यान हा सगळा प्रकार आम्ही कोर्टासमोरही आणला. मात्र आमचं म्हणणं कोर्टाने ऐकून घेतलं नाही अशीही खंत त्यांनी व्यक्त केली आहे. असं असलं तरीही सगळ्याच ईव्हीएम मशीनमध्ये अशा प्रकारचा बिघाड असेल असं माझं म्हणणं नाही. तसेच आम्ही VVPAT मशीमधल्या चिठ्ठ्या मोजण्याची मागणी केली होती. यापूर्वीच्या मतदानात सगळ्या चिठ्ठ्या मोजल्या जायच्या त्या आताच्या चिठ्ठ्यांपेक्षाही मोठ्या होत्या असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.
COMMENTS