साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडेच, तयारीला लागा – शरद पवार

साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडेच, तयारीला लागा – शरद पवार

कोल्हापूर – सातारा लोतसभेची जागा राष्ट्रवादीकडेच असणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून लवकरच लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होणार असून त्याला वेळ घालवून चालणार नसल्याचे स्पष्ट मतही पवारांनी व्यक्त केलं आहे. जागावाटपाचा विषय फार राहिलेला नाही, तो जवळजवळ निकाली लागला आहे. लोकसभा निवडणूक ही काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासह इतर मित्रपक्षांद्वारे लढवली जाणार आहे. त्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि मी चर्चा केली आहे. जेथे ते प्रभावी आहेत, निवडून येण्याची क्षमता आहे, तेथे त्यांना जागा देण्याचा निर्णय झाला असल्याचही पवारांनी पत्रकार परीषदेेत म्हटलं आहे.

दरम्यान त्या-त्या भागांतील प्रभावशाली नेत्यांना तेथून उमेदवारी दिली जाणार असल्याने जागावाटपाचा कोणताही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. कोल्हापूरसह सातारा आणि हातकणंगलेची जागाही राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे. तसेच लवकरच लोकसभेचे कॅम्पेनिंग सुरू करावे लागणार असून दोन्ही पक्षांचे नेते त्यांच्या सभांचे आयोजन करतील. औरंगाबाद, नागपूर, नाशिक यांसह अन्य ठिकाणी दोघांकडून एकत्रित सभा होतील, असेही पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS