पुणे- माझी पुणेरी पगडी बद्दलची भूमिका ही कोणत्याही एका विशिष्ट वर्गाच्या विरोधात नसल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पगडी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन आणि हल्लाबोलच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि छगन भुजबळ यांना पुणेरी पगडी घातली होती. त्याविषयी नाराजी व्यक्त करत पवारांनी यापुढील कोणत्याही कार्यक्रमात आमचा सत्कार करायचा असल्यास फुले पागोटा घालूनच सत्कार करावा अश्या सूचना दिल्या होत्या.व कार्यक्रमात छगन भुजबळ यांना फुलेंचा पागोटा घालून तो कसा असतो हेही कार्यकर्त्यांना दाखवून दिलं होतं. त्यावरच गदारोळ माजला होता. पुणेरी पगडी फेटाळून पुणेकरांचा अपमान केल्याचा आरोप शरद पवारांवर पुणेकरांसह विचारवंतकडून होत होते. त्याची जाणीव झाल्यानंतर पवार यांनी आज (शनिवार) पुण्याच्या एक कार्यक्रमात पगडी विषयीचा गैरसमझ दूर करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पवार यांचा फुले पागोटा चढवून सत्कार केला. त्याचाच धागा पकडत पवार यांनी वर्धापन दिनाच्या पुणेरी पगडी या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिल.
शाहू महाराज,ज्योतिबा फुले, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन महात्म्यानां मी आदर्श मानतो.छत्रपती एकच असतात म्हणून म्हणून त्यांची पगडी, टोपी सर्वसामान्यांनी घालायची नसतात. बाबासाहेब कधी टोपी किंवा पगडी घालत नसत. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुलेंच आतापर्यंत कार्य पहात मी त्यांच्या पागोटेच्या पुरस्कार केला. पुण्यावर टीका किंवा अपमान असा काही भाग नाही. मी पुण्यात शिकलोय आणि पुण्याचा मला अभिमान आहे अश्या शब्दात शरद पवारांनी पुणेरी पगडी या विषयावर आपले मांडले.
COMMENTS