तिसऱ्या आघाडीसाठी शरद पवारांकडून शिवसेनेला अप्रत्यक्ष निमंत्रण !

तिसऱ्या आघाडीसाठी शरद पवारांकडून शिवसेनेला अप्रत्यक्ष निमंत्रण !

पुणे –  आगामी निवणुकांमध्ये भाजप सरकारला पाडण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी सर्वपक्षीयांना सोबत घेऊन भाजपशी दोन हात करण्याची तयारी विरोधी पक्षांनी सुरु केली असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून देशभरातील सर्व पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचबरोबर सध्या भाजपच्या मित्रपक्षांनाही सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादीकडून केला जात आहे. काल झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात शरद पवार यांनीही शिवसेनेला तिस-या आघाडीसाठी अप्रत्यक्ष निमंत्रण दिलं आहे.शिवसेना आणि आघाडीची मते एक झाली, तर आगामी काळात भाजपचा पाडाव करता येऊ शकतो, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान पालघरमध्ये विजय झाल्याचा भाजपचा दावा किती पोकळ आहे हे सांगताना पवारांनी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. नोटाबंदी, सरकारची चार वर्षे, ईव्हीएम बिघाड, महाराष्ट्र सदन अशा अनेक मुद्द्यांवरून शरद पवारांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. तसेच याचबरोबर त्यांनी तिस-या आघाडीसाठी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे शिवसेना पवारांचं हे निमंत्रण स्वीकारणार का ?, नाही हे आगामी काळात समजणार आहे. सद्यस्थिती पाहता शिवसेना-भाजपमध्ये जोरदार वाद सुरु आहे. त्यामुळे या वादाचा लाभ तिस-या आघाडीला होऊ शकतो असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे.

 

COMMENTS