तंबाखूच्या व्यसनामुळे असह्य वेदना झाल्या – शरद पवार

तंबाखूच्या व्यसनामुळे असह्य वेदना झाल्या – शरद पवार

मुंबई – तंबाखूच्या वेसनामुळे मला असह्य वेदना सहन कराव्या लागल्या असून 40 वर्षांपूर्वीच मला या व्यसनापासून कोणी रोखलं असतं तर बरं झालं असतं असा खेद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. इंडियन डेन्टल असोसिएशनच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी तंबाखू आणि सुपारीच्या वेसनामुळे अनेक गोष्टींना समारे जावं लागलं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे इतरांनी तंबाखू आणि सुपारीपासून दूर रहावं असं आवाहनही शरद पवार यांनी केलं आहे.

दरम्यान तंबाखू आणि सुपारीच्या अतिसेवनामुळे शरद पवार यांना कॅन्सर झाला होता. या जीवघेण्या कॅन्सरवर मात करुन त्यांनी पुन्हा जोमाने आयुष्याचा प्रवास कसा सुरु केला याबाबतचे अनूभव त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले आहेत. कॅन्सरवर उपचार घेताना झालेल्या वेदना त्यांनी सांगितल्या. ‘सर्जरीमुळे आपल्याला प्रचंड त्रास झाला. आपले दात काढण्यात आल्याने तोंड पुर्णपणे उघडण्यास त्रास होत होता. बोलताना आणि अन्न गिळतानाही असह्य वेदना व्हायच्या’, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी इंडियन डेन्टल असोसिएशनला लागेल ती सर्व मदत करण्याचं आश्वासनही दिलं आहे.

 

COMMENTS