शरद पवार, राहुल गांधींची बैठक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होणार ?

शरद पवार, राहुल गांधींची बैठक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होणार ?

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत ‘6 जनपथ’ या पवारांच्या निवासस्थानी बैठक सुरु आहे. या बैठकीत काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन करण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्याॆच्या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान लोकसभेत विरोधी पक्षनेते कसे मिळवता येईल याचीही चाचपणी सध्या सुरु आहे.लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याने लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतपतही काँग्रेसला जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन झाला तर काँग्रेसला विरोधीपक्ष नेतेपद मिळू शकते. याबाबतही चर्चा केली जात आहे.

काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवार यांनी 25 मे 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली. शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्यानंतर शरद पवार हेच या नव्या पक्षाचे पहिल्यापासून राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. परंतु आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS