शरद पवार, सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या तरुणाला अटक

शरद पवार, सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या तरुणाला अटक

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या तरुणाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. वालचंद गिट्टे (34) असे या तरुणाचे नाव असून त्याला आज  न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर रोजी शरद पवार त्यांची कन्या खा. सुप्रिया सुळे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जगदीश पंचबुद्धे आणि राहुल कामळे यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 500 आणि 509 व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 67 कलमातर्गत गुन्हा दाखल केला. मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी गिट्टेला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

वालचंद गिट्टे एका खासगी कंपनीत कामाला असून, तो सुरेंद्रनगराचा रहिवाशी आहे.  त्याने आपल्या ट्विटवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया शिंदे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्षेपार्ह्य ट्विट केले. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्यामुळे पोलिसांनी या संबंधाने बरीच गुप्तता पाळत चौकशी चालवली. त्यानंतर आरोपी वालचंद्र गिट्टे याला अटक करण्यात आली असून, त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

COMMENTS