‘ती’ जागा स्वाभिमानीला देण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार, काँग्रेसची उडाली झोप ?

‘ती’ जागा स्वाभिमानीला देण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार, काँग्रेसची उडाली झोप ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत येण्यासाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं  लोकसभेच्या काही जागांची मागणी केली आहे. वर्धा, बुलढाणा व हातकणंगले या तीन जागांची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. या तीनही जागांसाठी संघटना नेते खासदार राजू शेट्टी अडून बसले आहेत. त्यामुळे वर्धेची जागा देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे रद्दबदली करणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान या लोकसभा मतदारसंघावर भाजपचा वरचष्मा असून महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष व काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार चारुलता टोकस यांच्या मातोश्री प्रभा राव या येथून खासदार राहिल्या होत्या त्यामुळे या जागेवर त्यांनी दावा केला असून त्यांनी स्वाभिमानीसाठी ही जागा सोडणार नसल्याचं म्हटलं आहे. तसेच याबाबत  काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हमी दिल्याचा दावा करीत त्यांनी प्रचारही सुरू केल्याचे स्पष्ट केले. या वृत्ताने काँग्रेस वर्तुळाची झोप उडाली असल्याचं बोललं जात आहे.

तसेच वर्धेची जागा काँग्रेसच लढणार असून वाटाघाटीत अन्य पर्याय सुद्धा आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी माझे बोलणे झाले असून मी निश्चिंत आहे, असल्याचं मत श्रीमती टोकस यांनी व्यक्त केलं आहे.

COMMENTS