औरंगाबाद – माझं सर्वात मोठं आणि तीव्र ऑब्जेक्शन आहे, माझं वय 80 असताना तुम्ही 85 का म्हणता असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांना विचारला आहे. पवार यांनी आज औरंगाबदमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. पवारांनी पत्रकार परिषदे घेऊन, औरंगाबादमधील कोरोना स्थितीची माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांचं वय आणि ते राज्यभर फिरुन घेत असलेला आढावा, लातूर भूकंपावेळी पवारांनी घेतलेले निर्णय, याबाबत प्रश्न विचारले त्यावेळी पवारांनी माझं सर्वात मोठं आणि तीव्र ऑब्जेक्शन आहे, माझं वय 80 असताना तुम्ही 85 का म्हणता असा सवाल केला आहे.
दरम्यान लातूरच्या भूकंप एका जिल्ह्यातील काही भागापुरता सिमीत होता. त्यावेळी तिथे जाऊन बसण्याची गरज होती. पण आताचं कोरोना संकट हे मोठं आहे, सबंध महाराष्ट्रात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात जाऊन बसले, तर अन्य जिल्ह्यातील तातडीने निर्णय घेण्याच्या समस्या निर्माण होतील. त्यामुळे आमचा सर्वांचा आग्रह आहे की कॅप्टनने एका ठिकाणी बसून, सगळी टीम काम करते की नाही, त्यावर नियंत्रण ठेवावं. काही कमतरता असेल ती सांगावी. पालकमंत्री इथून गेले की ते मुख्यमंत्री आणि संबंधित घटकांशी उद्या बोलतील. तसेच मुख्यमंत्री टीमकडून काम करुन घेत आहेत. सर्वांशी संवाद आणि समन्वय ठेवून मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावे लागतात. त्याप्रमाणे मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. मी फिरतोय कारण मी सतत लोकांमध्ये जाणारा माणूस, मला एका जागी बसवत नाही, असं शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.
COMMENTS