शेतकरी कामगार पक्षाची आक्रमक भूमिका

शेतकरी कामगार पक्षाची आक्रमक भूमिका

सरकारनं घोर फसवणूक केल्याचा आरोप

नाशिक : केंद्र आणि राज्य शासनाविरोधात मंगळवारी शेतकरी कामगार पक्षानं धरणे आंदोलन केलं. निवडून येण्यापूर्वी सरकारनं दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नसल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. सरकारकडे विविध मागण्या या कार्यकर्त्यांनी केल्या असून मागण्या मान्य न झाल्यासा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

यावेळी शेतीमालाला किफायतशीर भाव द्यावा, शेतक-यांना कर्जमुक्त करा, नव्याने त्वरीत कर्ज पुरवठा द्यावा, अवास्तव वीज बिले रदद करण्याची मागणी, वीज पुरवठा नियमीत करा, वाढती महागाई कमी करा, पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढ नियंत्रीत करा, भ्रष्टाचार कमी करा, दोषी अधिका-यांवर कारवाई करा, बेरोजगारांना काम द्या, आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

केंद्रात व राज्यात भाजपाचे संयुक्त सरकार सत्तेवर येताना दिलेली आश्वासने व सत्तेत आल्यानंतर केलेल्या घोषणा फसव्या असल्याचे लक्षात आल्याने शेतकरी, कष्टकरी व कामगार, व्यावसायिक यांचा भ्रमनिराश झाला असून, सरकारच्या जनहित विरोधी भुमिकेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.तो व्यक्त करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने आंदोलन केले..

 

COMMENTS