अभिनेत्री शिल्पा शिंदेचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

अभिनेत्री शिल्पा शिंदेचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

मुंबई – अभिनेत्री शिल्पा शिंदेनं राजकारणात एन्ट्री मारली असून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शिल्पा शिंदेने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  देशासाठी काही तरी करायचे आहे म्हणून राजकारणात प्रवेश केला असल्याचं शिल्पानं म्हटलं आहे. तसेच काँग्रेसने कधी जातपात केलं नाही, काँग्रेसच्या विचारसरणीवर माझा विश्वास असून राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत हीच इच्छा असल्याचंही शिल्पानं म्हटलं आहे. देशात बदल घडवण्याची गरज असून देशात केवळ काँग्रेस बदल करू शकते असा विश्वासही शल्पा शिंदेनं व्यक्त केला आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय घरात तिचा जन्म झाला असून शिल्पाचे वडील डॉ. सत्यदेव शिंदे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. शिल्पाच्या वडिलांना तिने कायद्याचं शिक्षण घ्यावं अशी इच्छा होती. पण शिल्पा शिंदेला अभिनेत्री व्हायचं होतं. त्यांनी शिल्पाला एक वर्ष दिलं होतं आणि तिनेही संधीचं सोनं करत यशस्वी अभिनेत्री झाली. 2013 रोजी तिच्या वडिलांचं निधन झालं.

तसेच कुटुंबाबाबत नकारात्मक कमेंट येत असल्याने ट्विटरला रामराम केल्याने शिल्पा शिंदे नुकतीच चर्चेत आली होती. शिल्पा शिंदे बिग बॉसच्या दहाव्या पर्वाची विजेती ठरली होती. बिग बॉस जिंकल्यानंतर शिल्पा शिंदे सुनील ग्रोव्हरच्या क्रिकेटवर आधारित वेब सीरिज ‘जिओ धन धना धन’ मध्ये झळकली होती.

शिल्पा शिंदेने टीव्ही शो ‘भाभीजी घर पे है’ मधून छोट्या पदड्यावर पदार्पण केलं होतं. अल्पावधीत तिचं अंगुरी भाभी पात्र लोकांच्या घराघरात पोहोचलं होतं. पण याच टीव्ही शोवरुन झालेल्या वादामुळे शिल्पा शिंदे चर्चेत आली होती. प्रकृतीचं कारण देत शिल्पा शिंदेने शोमधून एक्झिट घेतली होती. कराराचं उल्लंघन केल्याने तिच्यात आणि निर्मात्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. प्रोडक्शन टीमचे लोक सारखे त्रास देतात. काहीजण करिअर संपवण्याची धमकी देतात असा आरोप शिल्पा शिंदेने केला होता.

COMMENTS