प्रशांत किशोर यांनी शिवसेनेला दिला ‘हा’ सल्ला!

प्रशांत किशोर यांनी शिवसेनेला दिला ‘हा’ सल्ला!

मुंबई – मातोश्रीवर आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली.
या बैठकीला प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी उपस्थिती लावली. या बैठकीत किशोर यांनी शिवसेनेच्या खासदारांना मार्गदर्शनही केल्याची माहिती आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची प्रचार रणनिती ठरवण्याची जबाबदारी किशोर यांच्यावर सोपवण्यात आल्याची चर्चा आहे.

दरम्यान भाजपाबरोबर युती करायची असेल तर शिवसेनेने 50 टक्के जागा लढवाव्यात असा सल्ला प्रशांत किशोर यांनी शिवसेनेला दिली आहे. तसेच शिवसेना कशी मजबूत होईल याबाबत त्यांनी बैठकीत आपले विचार मांडले. बाळासाहेब हीच खरी शिवसेनेची ताकद, तेच पक्षाची मोठी शक्ती आहेत. त्यामुळे शिवसेनेला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही असही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

तसेच युतीवर आजच्या बैठकीत काहीही चर्चा झाली नसल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत खासदार, नेत्यांची मतंही विचारली नसल्याची माहिती आहे.

COMMENTS