अमोल कोल्हेंना निवडणुकीत पाडणार, लांडे समर्थकांची पोस्टरबाजी !

अमोल कोल्हेंना निवडणुकीत पाडणार, लांडे समर्थकांची पोस्टरबाजी !

पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अभिनेता अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने शिरुर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तयारी करत असलेले राष्ट्रवादीचे विलास लांडे यांचे कार्यकर्ते दुखावले असून कोल्हे यांच्याविरोधात विलास लांडेंच्या समर्थकांनी पोस्टरबाजी केली आहे. अमोल कोल्हेंना निवडणुकीत आम्ही पाडणार,अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून लढणार… आम्ही त्याला आमची ताकद दाखवणार, लांडे साहेबांनी अडचणीच्या काळात राष्ट्रवादी पक्षाला साथ दिली, पण आता तुम्हाला योग्य जागा दाखवणार, कोल्हेला पाडणार असं या पोस्टरमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान या पोस्टरबाजीमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. या मतदारसंघात काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विलास लांडे यांना काम करण्यास सांगितलं आणि त्यानंतर विलास लांडे यांनी राष्ट्रवादीच्या प्रचाराला सुरवात केली. पण अचानक अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि  अमोल कोल्हे यांना उमेदवारीही जाहीर केली. त्यामुळे  याचा फटका पक्षाला आगामी निवडणुकीत बसू शकतो असं बोललं जात आहे.

COMMENTS