मुंबई – अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या आराखड्यात बदल का करण्यात आला आहे असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. बदलेल्या आराखड्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाराजांच्या पुतळ्याची उंची 160 मीटरहून 126 मीटर करण्यात आली आहे. मात्र चौथ-याची उंची वाढवण्यात आली. त्याची उंची 32 मीटरहून 84 मीटर केली आहे. धातुच्या पुतळ्यावरील खर्च कमी करण्यासाठीच सरकाराचा हा आटापिटा सुरू आहे का ? असा सवालही चव्हाण यांनी केला आहे.
अरबी समुद्रातील शिवाजी महाराज स्मारकाच्या आराखड्यात बदल. राज्य शासनाने डिसेंबर २०१६ मध्ये स्मारकाच्या आराखड्यात बदल करून महाराजांच्या पुतळ्याची उंची १६० मी वरून १२६ मी केली, आणि चौथऱ्याची उंची ३२ मी वरून वाढवून ८४ मी केली. धातूच्या पुतळ्यावरील खर्च कमी करण्यासाठीचा आटापिटा? (१/२)
— Prithviraj Chavan (@prithvrj) March 6, 2018
स्मारकाच्या मूळ प्रस्तावाला 23 फेब्रुवारी 2015 रोजी पर्यावरणाची मंजुरी मिळाली होती. मग असं असतानाही डिसेंबर 2016 मध्ये स्मारकाच्या आराखड्यात बदल का करण्यात आला ? असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. उंची कमी केलेल्या नवीन आराखड्याला पर्यावरण खात्याची परवानगी मिळाली आहे का ? असा प्रश्नही त्यांनी सरकाराला विचारला आहे.
२३ फेब्रुवारी २०१५ रोजी मूळ प्रस्तावाला पर्यावरणीय मंजुरी मिळाली असतानादेखील डिसेंबर २०१६ मध्ये प्रकल्प आराखड्यात बदलाचे प्रयोजन काय? पुतळ्याची उंची कमी केलेल्या नवीन आराखड्याला पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे काय? (२/२)
— Prithviraj Chavan (@prithvrj) March 6, 2018
COMMENTS