मुंबई – कोरोनाच्या संकटामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आज साधेपणाने साजरा करण्यात आला. कोणतीही गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत सर्व शिवभक्तांनी घरीच राहून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरही अत्यंत साधेपणाने पण उत्साहाने काही मोजक्या मावळ्यांसह शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. खासदार छत्रपती संभाजी राजे यावेळी उपस्थित होते. विविध राजकीय नेत्यांनीही शिवराज्याभिषेक दिनाच्या ट्विटवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज मनमनात, शिवराज्याभिषक घराघरात असं ट्विट संभाजीराजे यांनी केलं आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 6, 2020
६ जून २०२० शिवराज्याभिषेक सोहळ्यातील काही क्षणचित्रे. संपूर्ण सोहळ्याची चित्रफत लवकरच!
छत्रपती शिवाजी महाराज मनामनात,
शिवराज्याभिषेक घराघरात!#शिवराज्याभिषेक_सोहळा pic.twitter.com/NW4ZE2zqow— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 6, 2020
सर्वसमावेशक, सहिष्णू, आदर्श शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार वंदन. सर्व शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छ असं ट्वीट उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.
सर्वसमावेशक, सहिष्णू, आदर्श शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार वंदन. सर्व शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!#Shivrajyabhishek_Din pic.twitter.com/WHLJY3vMni
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) June 6, 2020
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा! महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला एक अपूर्व मंगल क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक दिन.या दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रयतेच्या सुखाचा विचार करणाऱ्या शिवछत्रपतींवर अढळ श्रद्धा ठेवून वाटचाल करण्याचा हा संकल्प दिन असंल्याचं ट्वीट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा! महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला एक अपूर्व मंगल क्षण म्हणजे #शिवराज्याभिषेक दिन.या दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रयतेच्या सुखाचा विचार करणाऱ्या शिवछत्रपतींवर अढळ श्रद्धा ठेवून वाटचाल करण्याचा हा संकल्प दिन!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 6, 2020
त्यांचा लोककल्याणकारी राज्य कारभार जगात आदर्श मानला जातो. त्यांनी दाखविलेल्या वाटेवरून पुढे जाऊ या. शिवप्रभुंनी दिलेला हा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी आपण वचनबद्ध होऊ या. हे वचन त्यांच्या चरणी अर्पण करू या. शिवछत्रपतींना मानाचा मुजरा!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 6, 2020
सर्वार्थाने जनतेचे राज्य, सुराज्य स्थापन करत सर्वसामान्यांच्या मनांवर अधिराज्य करणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या राज्याला पुनश्च सक्षम व लोकाभिमुख करण्याचा संकल्प आज अधिक दृढ करूया. सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा असं ट्वीट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
सर्वार्थाने जनतेचे राज्य, सुराज्य स्थापन करत सर्वसामान्यांच्या मनांवर अधिराज्य करणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या राज्याला पुनश्च सक्षम व लोकाभिमुख करण्याचा संकल्प आज अधिक दृढ करूया. सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!#शिवराज्याभिषेकदिन pic.twitter.com/33yIvDF9Bt
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 6, 2020
रयतेचे राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त मानाचा मुजरा असं ट्वीट मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
रयतेचे राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त मानाचा मुजरा.#Shivaji_Maharaj #शिवराज्याभिषेक #Shivrajyabhishek pic.twitter.com/sDHMiUaPSA
— Ashok Chavan (@AshokChavanINC) June 6, 2020
गुलामगिरीत पिचलेल्या या मातीतील लोकांची मने आणि मनगटे स्वातंत्र्यांच्या विचाराने पुन्हा जिवंत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा , महाराष्ट्रातील तमाम बांधवाना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असं ट्वीट मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
गुलामगिरीत पिचलेल्या या मातीतील लोकांची मने आणि मनगटे स्वातंत्र्यांच्या विचाराने पुन्हा जिवंत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा 🙏
महाराष्ट्रातील तमाम बांधवाना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!#Shivrajyabhishek #ShivajiMaharaj pic.twitter.com/hTH24FnPNk
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 6, 2020
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाजी महाराजांना शूद्र मानून शिवराज्याभिषेक करण्यास नकार देणा-या विचारांचा बिमोड करण्याची शपथ घेऊनच राज्याभिषेक दिन साजरा करा असं आवाहन सचिन सावंत यांनी केलं आहे.
छ. शिवाजी महाराजांना शूद्र मानून त्यांच्या राज्याभिषेकास नकार देणाऱ्या विचारांचा बिमोड करण्याची शपथ घेऊनच #राज्याभिषेक दिन साजरा केला जाऊ शकतो. छ. शिवाजी व संभाजी महाराजांनी अशा प्रवृत्तींचा विरोधच केला. म्हणूनच अशा प्रवृत्तींच्या लिखाणात या दोन्ही महापुरुषांचा द्वेष दिसून येतो
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 5, 2020
हिंदवी स्वराज्याची पताका डौलात फडकविणारे महापराक्रमी, आराध्यदैवत, रयतेचे राजे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी त्यांना कोटी कोटी दंडवत आणि मानाचा मुजरा !
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा असं ट्वीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
हिंदवी स्वराज्याची पताका डौलात फडकविणारे
महापराक्रमी, आराध्यदैवत, रयतेचे राजे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी त्यांना कोटी कोटी दंडवत आणि मानाचा मुजरा !
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!#ShivRajyaAbhishek_Din pic.twitter.com/fXXODMaEwl— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 6, 2020
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमीत्त सर्वांना शुभेच्छा असं ट्वीट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमीत्त सर्वांना शुभेच्छा.#शिवराज्याभिषेक#Shivrajyabhishek_Din pic.twitter.com/b723CGr7ge
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 6, 2020
COMMENTS