शिवरायांच्या राज्याभिषेकास विरोध करणा-या विचारांचा बिमोड करणा-याची शपथ घेऊनच राज्याभिषेक दिन साजरा करा

शिवरायांच्या राज्याभिषेकास विरोध करणा-या विचारांचा बिमोड करणा-याची शपथ घेऊनच राज्याभिषेक दिन साजरा करा

मुंबई – कोरोनाच्या संकटामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आज साधेपणाने साजरा करण्यात आला. कोणतीही गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत सर्व शिवभक्तांनी घरीच राहून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरही अत्यंत साधेपणाने पण उत्साहाने काही मोजक्या मावळ्यांसह शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. खासदार छत्रपती संभाजी राजे यावेळी उपस्थित होते. विविध राजकीय नेत्यांनीही शिवराज्याभिषेक दिनाच्या ट्विटवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज मनमनात, शिवराज्याभिषक घराघरात असं ट्विट संभाजीराजे यांनी केलं आहे.

सर्वसमावेशक, सहिष्णू, आदर्श शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार वंदन. सर्व शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छ असं ट्वीट उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा! महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला एक अपूर्व मंगल क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक दिन.या दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रयतेच्या सुखाचा विचार करणाऱ्या शिवछत्रपतींवर अढळ श्रद्धा ठेवून वाटचाल करण्याचा हा संकल्प दिन असंल्याचं ट्वीट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

सर्वार्थाने जनतेचे राज्य, सुराज्य स्थापन करत सर्वसामान्यांच्या मनांवर अधिराज्य करणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या राज्याला पुनश्च सक्षम व लोकाभिमुख करण्याचा संकल्प आज अधिक दृढ करूया. सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा असं ट्वीट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

रयतेचे राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त मानाचा मुजरा असं ट्वीट मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

गुलामगिरीत पिचलेल्या या मातीतील लोकांची मने आणि मनगटे स्वातंत्र्यांच्या विचाराने पुन्हा जिवंत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा , महाराष्ट्रातील तमाम बांधवाना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असं ट्वीट मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाजी महाराजांना शूद्र मानून शिवराज्याभिषेक करण्यास नकार देणा-या विचारांचा बिमोड करण्याची शपथ घेऊनच राज्याभिषेक दिन साजरा करा असं आवाहन सचिन सावंत यांनी केलं आहे.

हिंदवी स्वराज्याची पताका डौलात फडकविणारे महापराक्रमी, आराध्यदैवत, रयतेचे राजे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी त्यांना कोटी कोटी दंडवत आणि मानाचा मुजरा !
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा असं ट्वीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमीत्त सर्वांना शुभेच्छा असं ट्वीट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

COMMENTS