उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, शिवसेनेत आनंदराव अडसूळ यांचे पंख छाटले !

उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, शिवसेनेत आनंदराव अडसूळ यांचे पंख छाटले !

मुंबई – शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची शिवसेनेच्या दोन्ही सभागृहाच्या संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी संजय राऊत फक्त राज्यसभेत पक्षाचे नेते होते. आनंदराव अडसूळ यांच्याकडे लोकसभेतील गटनेतेपद असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय. मात्र दोन्ही सभागृहाचे नेते म्हणून आता संजय राऊत काम पाहणार आहेत. अशी रचना पक्षात अनेकदा समन्वयाच्या दृष्टीने करावी लागते. ती याआधीही अनेक राजकीय पक्षांनी केलेली आहे असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे.

शिवसेनेचे एकूण 21 खासदार आहेत. त्यामध्ये लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 3 खासदारांचा समावेश आहे. आनंदराव आनंदराव अडसूळ यांना लोकसभा नेतेपदी कायम ठेवले असले तरी त्यांच्या डोक्यावर संजय राऊत यांना बसवले आहे. अडसूळ यांनी अविश्वास ठरावावेळी भाजप सरकराला समर्थन कराण्याचा व्हिप काढला होता. तो प्रकार त्यांना भोवल्याची चर्चा शिवसनेत आहे. शिवसेनेनं आधी समर्थनाचा व्हिप काढला होता. नंतर तो मागे घेतला होता. तसंच शिवसेनेनं कामकाजावर बहिष्कार टाकला होता. या प्रकरणावरुन शिवसनेची मोठी नाचक्की झाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे हे अडसूळ यांच्यावर नाराज होते. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.

COMMENTS