“भाजपचे 30 आमदार काँग्रेसच्या संपर्कात”

“भाजपचे 30 आमदार काँग्रेसच्या संपर्कात”

भोपाल – मध्य प्रदेशातील भारतीय जनता पार्टीचे 30 विद्यमान आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा मध्य पदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी केला आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी 2 हजार उमेदवार काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामध्ये भाजपचे विद्यमान 30 आमदार आहेत असंही कमलनाथ यांनी सांगितलं. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर हे काही दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात कलमनाथ यांच्यासोबत होते. त्यावरुन पत्रकारांनी गौर यांना काँग्रेसमध्ये येण्याचं निमंत्रण देणार का ? या प्रश्नावर गौर यांनाच काय तर मी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही काँग्रेसमध्ये येण्याचं निमंत्रण देतो असंही कमलनाथ म्हणाले. येत्या डिसेंबरमध्ये मध्यप्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये यावेळी सत्तेसाठी जोरदार संघर्ष होणार आहे.

COMMENTS