राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रित यावे, शिवसैनिकाचं अनोखं आंदोलन !

राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रित यावे, शिवसैनिकाचं अनोखं आंदोलन !

मुंबई – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यावे यासाठी शाम गायकवाड हा शिवसैनिक डॉक्टर आंबेडकर मार्गावरील दादर टीटी खोदादाद सर्कल येथील जगन्नाथ शंकरशेट् पुलावरील मनोऱ्यावर चढला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न अग्निशमन दल आणि पोलीस करत असून या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्रित यावे अशी मागणी या शिवसैनिकानं केली असून राज्याच्या भल्यासाठी त्यांनी एकत्रित यावे अशी मागणी त्याने केली आहे.

COMMENTS