डोंबिवली – शिवसेनेनं भाजप आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांच्या फोटोला चपला मारो आंदोलन शिवसैनिकांनी केलं आहे. आशिष शेलार यांची बुद्धी गुडघ्यामध्ये असून जिथे जातील तिथे त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर मिळेल असा इशारा नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी दिला आहे.
दरम्यान नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही”, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या याच विधानावर भाजप नेतेआशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली होती.हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?”, असा घणाघात शेलारांनी केला होता. यानंतर त्यांनी माफी मागितली आहे.परंतु त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत शेलार यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
COMMENTS