उत्तर भारतीयांना एकत्रित करण्यासाठी शिवसेनेचा ‘भोजपुरी रंगारंग’ कार्यक्रम !

उत्तर भारतीयांना एकत्रित करण्यासाठी शिवसेनेचा ‘भोजपुरी रंगारंग’ कार्यक्रम !

मुंबई – उत्तर भारतीय लोकांना एकत्र करण्यासाठी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावतीने भोजपुरी रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत  एकला चलोचा नारा दिला आहे. या ना-यानंतर आता सर्वच प्रांतातील मतदारांची मते वळवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान कांदिवलीतील ठाकूर व्हीलेज याठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उद्या संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी भोजपुरी अभिनेते आणि सुपरस्टार खेसारीलाल यादव आणि अभिनेत्री रितू सिंह उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS