शिवसेनेनं भाजपपुढे ठेवला ‘हा’ प्रस्ताव, प्रस्ताव मान्य केला तरच युती होणार !

शिवसेनेनं भाजपपुढे ठेवला ‘हा’ प्रस्ताव, प्रस्ताव मान्य केला तरच युती होणार !

मुंबई – दोन दिवसापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपपुढे प्रस्ताव ठेवला आहे.तसेच जर भाजपनं हा प्रस्ताव मान्य केला तरच आगामी निवडणुकांमध्ये युती केली जाणार असल्याची अटही शिवसेनेनं भाजपपुढे ठेवली असल्याची माहिती आहे.

दरम्यान शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत 152 जागा आणि मुख्यमंत्रीपद मागितलं असल्याची माहिती आहे. या प्रस्तावावर भाजपकडून तूर्त कुठलीही प्रतिक्रिया आली नसून भाजपला हा प्रस्ताव मान्य असल्यास युतीबाबत पुढची बोलणी होणार आहे. त्यामुळे शिवसेनेनं ठेवलेला विधानसभा निवडणुकीत 152 जागा आणि मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव भाजपकडून मान्य केला जाणार आहे किंवा नाही याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS