लातूर – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होईल असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु सर्व 48 लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार देईल अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मांडली आहे. तसेच 48 पैकी 40 जागांवर भाजप विजयी झाला पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. भाजपने शिवसेनेसोबत युती करण्याचा नाद सोडल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान भाजपची सर्वात मोठी ताकद कार्यकर्ता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणुकीच्या मूडमध्ये गेले पाहिजे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 2 कोटी मते पडली पाहिजेत. असे झाले तर 2014 पेक्षा मोठा विजय आपल्याला 2019 मध्ये मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.तसेच मित्रपक्षांसोबत युती करायची की नाही हा अध्यक्षांचा विषय आहे. त्यात अडकून पडायची गरज नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.
COMMENTS