मातोश्रीवरील बैठकीत शिवसेना-भाजपमधील फॉर्म्युला ठरला, लवकरच युतीची घोषणा!

मातोश्रीवरील बैठकीत शिवसेना-भाजपमधील फॉर्म्युला ठरला, लवकरच युतीची घोषणा!

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील  युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी रात्री मातोश्रीवर जाऊन चर्चा केली. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला असल्याची माहिती आहे. भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली आणि ही चर्चा यापुढेही अशीच सुरू राहील. लवकरच युतीबाबतच्या निर्णयाची माहिती माध्यमांना दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.. शेतकरी सामान्य नागरिकांशी संबंधित प्रश्न आणि इतर सार्वजनिक विषय शिवसेनेकडून आजच्या बैठकीत मांडले गेले. भाजपादेखील त्याविषयी गंभीर असून काही निर्णय घेतले जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच  पालघरची जागा आणि लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकीचे जागावाटपावरही चर्चा करण्यात आली आहे.

COMMENTS