मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप शिवसेनेला धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण टीव्ही नाईन आणि सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेनुसार या दोन्ही पक्षांच्या जागा कमी होणार असल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. भाजप शिवसेने युतीला 34 जागा मिळतील तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष यांना 14 जागा मिळतील, असा अंदाज या सर्व्हेने व्यक्त केला आहे. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत युतीच्या जागांची घसरण होणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान 2014 मध्ये भाजप शिवसेनेनयला 42 जागा मिऴाल्या होत्या तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला फक्त 6 जागा मिळाल्या होत्या. परंतु आगामी निवडणुकीत यामध्ये मोठा बदल होणार असल्याचा अंदाज या सर्व्हेनं मांडला आहे. भाजप शिवसेने युतीला 34 जागा मिळतील तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष यांना 14 जागा मिळतील, असा अंदाज या सर्व्हेने मांडला आहे.
COMMENTS