भाजपनं शब्द पाळला नाही”, शिवसेनेच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्यानं दिला राजीनामा !

भाजपनं शब्द पाळला नाही”, शिवसेनेच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्यानं दिला राजीनामा !

नवी दिल्ली – भाजपला आणखी एक धक्का बसला असून शिवसेना नेते आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी अवजड उद्योग मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. ३० मेला मी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अवजड उद्योग खाते मी संभाळले. त्यानंतर महाराष्ट्रात निवडणूक झाल्या. त्यात महायुतीला जनमत मिळाले. निवडणूक लढताना सत्ता आणि पदांचं समान वाटप हे सूत्र ठरले होते. पण भाजपाने हा शब्द पाळला नसल्यामुळे मी राजीनामा देत असल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सावंत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. आज सकाळीच त्यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना अखेर एनडीएतून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादी-काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करणार असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रातूनही शिवसेना आता बाहेर पडली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS