चाणक्यने ऐसा भी कहा है,…शिवसेनेनं भाजपला सांगितली चाणाक्य नीती !

चाणक्यने ऐसा भी कहा है,…शिवसेनेनं भाजपला सांगितली चाणाक्य नीती !

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना त्यांच्या पक्षात राजकारणातले चाणाक्य म्हटलं जातं. राजकीय डावपेच, आणखी यामध्ये तरबेज असलेल्या अमित शहा यांनी त्यांच्या चाणाक्य नीतीने 2014 नंतर देशभर भाजपचा जनाधार वाढवला. अनेक भाषणांमध्ये अमित शहा हे चाणाक्यांचा उल्लेख करत असतात. काही दिवसांपूर्वी तर शाह यांनी पुण्यात चाणाक्यांवर व्याखानंही दिलं. त्यांच्या या चाणाक्य नीतीला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही चाणाक्य नीतीमधून उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करुन हे उत्तर दिलं आहे. चाणक्यने ऐसा भी कहा है, रिश्ते तोडने तो नहीं चाहिए, लेकिन जहाँ कदर ना हो, वहां निभाने भी नहीं चाहिए.

संजय राऊत यांच्या ट्विला स्वबळाची किनार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवेसना स्वबळाच्या डरकाळ्या फोडत आहे. मात्र कालच उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत नंतर बघू असं बोलून युतीबाबत पुन्हा भाजपच्या आशा वाढवून ठेवल्या आहेत. त्याच्या दुस-याच दिवशी संजय राऊत यांनी शिवसनेची चाणक्य नीती भाजपला सांगितली आहे.

COMMENTS