शिवसेनेची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार !

शिवसेनेची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांविरोधात मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. राज्य निवडणूक आयोग प्रशासन यंत्रणा दबावाखाली काम करीत असल्याचे जाणवून आल्यानं मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार. यापूर्वी शिवसेनेनं केलेल्या दोन आक्षेपांमध्ये जलदगतीने सुनावणी केली नसल्यामुळे अखेर निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. तसेच भाजपनं पैसे वाटप केल्याप्रकरणीही शिवसेनेनं तक्रार दाखल केली असून याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे आमदार अमित घोडा यांनी पत्राद्वारे मागणी केली असून भाजपवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरुन आता राजकीय वातावरण चांगलच तापत असल्याचं दिसून येत आहे. तसेच याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात विरोधी पक्षातील नेत्यांनीही जिल्हाधिका-यांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक आयोग काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS