आत्महत्याग्रस्त व्यापा-याच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून 20 लाखांची मदत !

आत्महत्याग्रस्त व्यापा-याच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून 20 लाखांची मदत !

सातारा – नोटा बंदी व जीएसटीला कंटाळून आत्महत्या केलेल्या कराड येथील तरुण ज्वेलर्स व्यापारी राहुल फाळके यांच्या कुटुंबाला शिवसेनेनं मदत केली आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्षाच्यावतीने राहुल यांच्या कुटुंबाला २० लाख रुपयांची मदत केली आहे. तसेच राहुल यांच्या मुलाच्या शिक्षणाचा सर्व खर्च शिवसेनेनं उचलला असून शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यानी प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना ही मदत सुपूर्द केली आहे.

दरम्यान सातारा जिल्ह्यातील कराड येथील ज्वेलर्स व्यावसायिक राहुल फाळके यांना नोटबंदी आणि जीएसटीचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत आला होता. आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे राहुल यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी राहुल यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. तसेच या पोस्टमध्ये त्यांनी आपला व्यवसाय जीएसटीमुळे अडचणीत सापडला आहे. अनेकांना मी मदत केली परंतु सर्वांनी मला धोका दिला असून त्यामुळे मी आर्थिक अडचणीत सापडलो आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच राहुल फाळके हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. भविष्यात कुटुंबीयांकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी फेसबुक पोस्टमधून केलं होतं. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियांना मदत केली आहे.

COMMENTS