शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदासाठी जानेवारीत निवडणूक !

शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदासाठी जानेवारीत निवडणूक !

मुंबई – निवडणूक आयोगाने बंधनकारक केल्यामुळे सर्वच पक्षांना आता पक्षांतर्गत निवडणुका घेणं अनिवार्य झालंय. त्यानुसार आता शिवसेनेतही पक्षांतर्गत निवडणुका होणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात या निवडणुका घेतल्या जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना नेते, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य आणि शिवसेना उपनेते या पदासाठी या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी बाळकृष्ण जोशी यांना मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमण्यात आलंय.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

5 जानेवारी ते 10 जानेवारी 2018 या कालावधीत नामांकन पत्र दिली आणि स्वीकारली जातील.

11 जानेवारी 2018 ला नामांकन पत्रांची छाननी

13 जानेवारी 2018 ला दुपारी 3 वाजेपर्यंत नामांकन पत्र मागे घेता येणार

23 जानेवारी आवश्यकता भासल्यास सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मतदान

त्यानंतर 3 वाजता मतमोजणीस सुरुवात होऊन निकाल जाहीर करण्यात येतील.

विद्यमान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच या पदावर पुन्हा निवड होण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेना नेते, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य आणि उपनेते पदावर कोणाची वर्णी लागते याबबत आता उत्सुकता लागली आहे.

COMMENTS