शिवसैनिकाच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती समोर !

शिवसैनिकाच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती समोर !

ठाणे  शिवसेना नेते शैलेश निमसे यांच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी पत्नी साक्षी निमसे हिला ठाणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. साक्षीसोबत प्रमोद लुटे या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. तसेच इतर तीन आरोपींचा अद्याप शोध सुरु आहे. भिवंडी तालुक्यातील दिघाशी जवळील देवचोळा येथे शैलेश निमसे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर त्यांची ओळख होऊ नये म्हणून त्यांचा मृतदेह पेटवण्यात आला होता.परंतु पोलिसांनी केलेल्या तपासानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान शैलेश निमसे हे शहापूरमधील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख होते. शैलेश निमसे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरुन पत्नीसोबत त्यांचे वाद होत असत. पत्नीला ते मारहाण करायचे. यातून साक्षीने हत्येची सुपारी देत, घरातच शैलेश निमसे यांचा गळा दाबून हत्या केली, असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

COMMENTS