मुंबई – काही दिवसांपूर्वी मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने आनंदी झालेल्या शिवसेनेला हा आनंद क्षणीक ठरण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 पैकी 4 नगरसेवकांची घरवापसी होण्याची शक्यता आहे.
या चार नगरसेवकांनी राज ठाकरे याची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक फुसका निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवबंधन बांधलेल्यापैकी दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, हर्षला मोरे हे मनसेत पुन्हा दाखल होणार आहेत. यापैकीच दोन नगरसेवकांनी राज ठाकरेंशी फोनवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान शिवसेनेनं या बातमीचं खंडण केलंय. सर्व 6 नगरसेवक शिवसेनेसोबतच असल्याचा दावा केला आहे.
शिवसेनेने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून मनसेतून आलेले सर्व 6 नगरसेवक शिवसेनेसोबतच आहेत. असा दावा पक्षातर्फे करण्यात आला आहे.
COMMENTS