…आणि विधानसभेत शिवसेना आमदारानं पळवला राजदंड !

…आणि विधानसभेत शिवसेना आमदारानं पळवला राजदंड !

मुंबई – अंगणवाडी सेविकांना लावलेला मेस्मा कायदा मागे घेण्याबाबात शिवसेना आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी आज विधीमंडळात चांगलाच गोधळ घातला असल्याचं पहावयास मिळालं आहे. विधानसभेत याप्रश्नी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेचे उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सभागृहातील राजदंड पळवला होता. जोपर्यंत मेस्मा रद्द केला जात नाही. तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही अशीच भूमिका या आमदारांनी घेतली होती.

दरम्यान यावेळी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार करत असून त्यांची हुकूमशाही प्रवृत्ती सुरू असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावायचा असेल तर त्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याची मागणी शिवसेनेने केली असून मेस्मा कायदा मागे घेतल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू न देण्याची भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. एकूणच विरोधकांनी आज घातलेल्या गोंधळामुळे सभागृहामध्ये चांगला वातावरण तापलं असल्याचं पहावयास मिळालं आहे.

 

COMMENTS