मुंबई – राज्यातील सत्तास्थापनेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे ए,बी,सी असे सर्व पर्याय तयार असल्याचा खुलासा शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. ‘ए’ म्हणजे महायुतीत ठरल्याप्रमाणे अडीच-अडीच वर्षासाठी भाजप-शिवसेनेचे मुख्यमंत्री असेल. तसे झाले नाही तर ‘बी’ प्लॅन तयार असून, त्याप्रमाणे दुसऱ्या पक्षासोबत जायचं का ? याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असंही सत्तार यांनी म्हटलं आहे.
तसेच शेवटचा पर्याय असेलला ‘सी’ प्लॅन उद्धव ठाकरे हेच ठरवतील. ते जे सांगतील त्याप्रमाणे शिवसेनेचे आमदार निर्णय घेतील. त्यांनी राजीनामे देण्याचे सांगितले तर देऊन टाकू. उद्धव ठाकरे यांनी विरोधात बसण्याचा निर्णय घेतला तर आमची विरोधात बसण्याची तयारी आहे. तसेच इतर पक्षाला सोबत घेऊन सत्ता बनवण्यासाठी सांगितले तर तसेही करू, असंही अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेना आमदारांची आज बैठक घेतली. या बैठकीनंतर एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
COMMENTS