राष्ट्रवादीनेही शिवसेनेचा आमदार फोडला?

राष्ट्रवादीनेही शिवसेनेचा आमदार फोडला?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता वरळी मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे हे शिवेसेनाला ‘जय महाराष्ट्र’ करून ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने खरच शिवसेनेचा आमदार फोडला का हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांचा सुनिल शिंदेंनी पराभव केला होता. परंतु आगामी निवडणुकीत सुनिल शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे सुनिल शिंदे हे शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीत जाऊ शकतात असं बोललं जात आहे.

COMMENTS