चंद्रकांत पाटलांना स्वतः निवडून येता येत नाही,  विधानसभेत ते मागच्या दाराने आले – शिवसेना खासदार

चंद्रकांत पाटलांना स्वतः निवडून येता येत नाही, विधानसभेत ते मागच्या दाराने आले – शिवसेना खासदार

सांगली – महापालिका निवडणुकीची रनधुमाळी सुरु आहे, तर या निवडणुकीमध्ये युतीबाबत शिवसेनेबरोबर चर्चा सुरु आहे असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी चांगलाच टोला लगावला आहे. शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवणार असून, मंत्री चंद्रकांत पाटील हे राष्ट्रीय स्तरावरील नेते आहेत, त्यांना स्वतः निवडून येता येत नाही. विधानसभेत मागच्या दाराने ते निवडून आलेले आहेत. असा टोला शिवसेना नेते ख़ासदार गजानन कीर्तिकर यांनी लगावला आहे. सांगलीमध्ये कीर्तिकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपला मराठा कार्ड पाहिजे म्हणून त्यांना वरच्या टोकावर मंत्रीपदावर नेऊन ठेवलं आहे. पैशाचा पाऊस टाकून, ज्याच्याकडे जनाधार आहे त्यांची माणसे विकत घेण्यात ते एक्स्पर्ट आहेत. 2019 साली मोदींना काहीही करून पंतप्रधान बनवायचं आहे. ज्या मोदींच्या पायाखालची वाळू घसरली आहे त्यांना पंतप्रधान करण्याचं काम चंद्रकांत पाटलांनी हातात घेतलं आहे. असंही ख़ासदार गजानन कीर्तिकर यांनी संगीतलं आहे.

सांगली, मिरज आणि कूपवाड शहर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिड़े गुरूजी यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतली आहे. गुरूजी यांनी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर आणि संपर्क प्रमुख नितिन बानगुडे पाटील यांची भेट घेतली. सांगलीतील अमराई क्लबमधील बंद खोलीमध्ये सुमारे अर्धा तास ही चर्चा झाली. दरम्यान संभाजी भिडेंच्या यांच्या मनात शिवसेनेबद्दल प्रेम आहे त्यामुळे ते भेटण्यासाठी आले होते. आम्हाला अपेक्षा आहे की भिड़े गुरूजी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मदत करतील तसेच गुरूजी फक्त उद्धव ठाकरेंची भेट घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी आले होते अशी माहिती ख़ासदार गजानन कीर्तिकर यांनी दिली आहे.

COMMENTS