मुंबई – भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घेण्यात आल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला होता. सैनिकांच्या पत्निविषयी अवमानकारक वक्तव्य करणा-या परिचारकांचं निलंबन कायम ठेवण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे. शिवसेना आमदारांच्या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज काही काळ तहकूब करण्यात आलं होतं. तसेच सुनील प्रभू यांनी परिचारक यांचा उल्लेख देशद्रोही म्हणून केला आहे. प्रशांत परिचारक हे देशद्रोही असून त्यांचं निलंबन मागे घेऊ नका अशी मागणी प्रभू यांनी केली आहे.
दरम्यान विधानपरिषदेतही प्रशांत परिचारक यांच्या निलंबनावर गोंधळ पहायला मिळाला आहे. अनिल परब यांनी परिचारकांच्या निलंबणावर आक्षेप घेतला असून हा जवानांचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांना बडतर्फ करुन त्यांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी परब यांनी केली आहे. शिवसेनेने केलेल्या या गोंधळामुळे सभागृहात चांगलंच वातावरण तापलं असल्याचं पहावयास मिळालं आहे.
COMMENTS