शिवसेनेच्या लढ्याला यश, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नामविस्तारानंतर जल्लोष !

शिवसेनेच्या लढ्याला यश, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नामविस्तारानंतर जल्लोष !

मुंबई – शिवसेनेच्या लढ्याला अखेर यश आलं असून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच्या नामविस्तारानंतर शिवसेनेचा जल्लोष केला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसैनिकांनी अभिवादन केलं आहे. या विमानतळाच्या नामविस्तारासाठी शिवसैनिकांनी काही दिवसांपूर्वीच आंदोलन केलं होतं.

दरम्यान महाराजांचा पुतळा मूळ जागी स्थापन करणं आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर असलेल्या पुतळ्याला मेघडंबरी लावणं हे कामही लवकर पूर्ण करण्याची मागणी महाडेश्वर यांनी केली आहे. तसेच मुंबईत शिवाजी महाराजांच्या नावाचा जिथे जिथे उल्लेख आहे अशी सर्व ठिकाणं, वास्तूंचा (शिवाजी मंदिर, शिवाजी पार्क) नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज करण्यासाठी शिवसेना आग्रही असून याबाबत पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS