मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सुप्रिया सुळेंना राज्यसभेवर पाठवण्याचा पक्षाने निर्णय घेतल्यानंतर बाळासाहेबांनी शिवसेनेचा पाठिंबा देत ‘कमळी’ची (भाजपा) चिंता तुम्ही करू नका, असा विश्वास दिला आणि विशेष म्हणजे सुप्रिया या बिनविरोध राज्यसभेवर गेल्या असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. ‘कलर्स मराठी’ या वाहिनीवरील ‘ठाकरे यांना मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात बोलत असताना पवार यांनी ही आठवण सांगितली आहे.
दरम्यान राष्ट्रवादीच्यावतीने सुप्रिया सुळे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही गोष्ट बाळासाहेबांना समजली. त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत प्रश्न विचारून सुप्रिया यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. भाजपाची चिंता करू नका, मी त्यांना सांभाळून घेईन, असे म्हटले. या निवडणुकीत सुप्रिया या बिनविरोध निवडून गेल्या. असल्याची आठव शरद पवार यांनी सांगितली.
COMMENTS