भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर ?, नारायण राणेंनी व्यक्त केली भूमिका !

भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर ?, नारायण राणेंनी व्यक्त केली भूमिका !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती झाली तर भाजपसोबत राहणार का ? याबाबत स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजप आणि शिवसेनेनं युती केली तर महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात स्वतंत्र्य लढणार असल्याची घोषणा राणे यांनी केली आहे. तसेच केंद्रात भाजपच्या 200 जागा येतील’, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

दरम्यान शिवसेनेला डिवचण्यासाठी निवडलं असेल तर जोरात डिवचायला पाहिजे. शिवसेनासारख्या पक्षाला याचा काहीही फरक पडत नाही. सेना सत्तेतून बाहेर पडत नाही. त्यांना किक मारूनच बाहेर काढावे लागणार आहे अन्यथा ते बाहेर पडणार नाहीत असंही यावेळी राणे यांनी म्हटलं आहे. ते एका वत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

तसेच यावेळी राणे यांनी त्यांचा मुलगा निलेश राणे यांची पाठराखण केली आहे. माझ्या मुलाने जे बोललं ते चुकीचं नाही. माझ्याबद्दल शिवसेनेच्या नेत्यांनी अनेक आरोप केले. त्यामुळे माझ्या मुलाला राग येणे साहजिकच आहे. त्याने ज्या भाषेत उत्तर दिले ते कुणीही देऊ शकतं. शेवटी तो राणेंचा मुलगा आहे, असं म्हणत नारायण राणे यांनी निलेश राणे यांची जोरदार पाठराखण केली.

 

COMMENTS