अहमदनगर – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा आणि भाजपमधून बडतर्फ केलेला अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमविरोधात उद्या अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. श्रीपाद छिंदमला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची मागणी केली जात असून या पार्श्वभूमीवर उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने छिंदमवर कारवाई केली असून त्याला अहमनगर जिल्ह्यातून 15 दिवसांपासून तडीपार करण्यात आले आहे.
दरम्यान श्रीपाद छिंदम सध्या जामीनावर बाहेर आला असून नगरमध्ये उद्या सकाळी 11 वाजता शिवप्रेमींच्यावतीने छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी महाराज पुतळ्यापासून हा मोर्चा सुरू होणार असून तो माळीवाडा वेस, पंचपीर चावडी, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोडमार्गे चौपाटी कारंजा येथे येणार आहे.
COMMENTS