बाळासाहेबांप्रमाणे राज ठाकरेंसाठीही चांदीचं सिंहासन !

बाळासाहेबांप्रमाणे राज ठाकरेंसाठीही चांदीचं सिंहासन !

मुंबई – बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच राज ठाकरे यांनीही सिंहासनावर बसून पक्ष चालवावा यासाठी त्यांच्या एका चाहत्यानं राज यांना चक्क चांदीचं सिंहासन भेट दिलं आहे. पुण्यातल्या विधाते कुटुंबियांनी राज यांना हे चांदीचं सिंहासन भेट दिलं. परंतु चांदीचं सिंहासन घेऊन विधाते कुटुंब कृष्णकुंजवर पोहचलं असता राज ठाकरे यांनी मात्र हे सिंहासन घेण्यास नकार दिला आहे.

दरम्यान या कुटुंबातले सर्वच सदस्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चाहते आहेत. यासाठी त्यांनी ठाकरेंसाठी चक्क एक चांदीच सिंहासन तयार करून घेतलं. राज यांनी या सिंहासनावर बसून आपला पक्ष चालवावा अशी या चाहत्यांची इच्छा होती. परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही… पण, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मनसेचाच होणार असा अभिप्राय आपल्या स्वाक्षरीसह राज ठाकरेंनी चाहत्यांना दिला आहे.

COMMENTS