शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेनंतर कणकवलीतील राजकीय हालचाली वाढल्या !

शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेनंतर कणकवलीतील राजकीय हालचाली वाढल्या !

कणकवली – शिवसेनेनं आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर कणकवलीमधील चुरस आणि राजकीय हालचाली वाढल्या असल्याचं दिसत आहे. नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाला पहिल्याच मोठ्या सार्वत्रिक निवडणुकीत रोखण्यासाठी येथील नगरपंचायत लढतीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होत्या. परंतु आता शिवसेनेनं स्वतंत्र लढण्याची घोषणा केल्यानंतर येथील राजकीय चुरस वाढली असल्याचं दिसत आहे. कणकवली नगरपंचायतीत सर्व १७ प्रभागांतून प्रभावी जनसंपर्क असलेले तगडे उमेदवार उभे करणार असल्याचं शिवसेनेनं जाहीर केले आहे. येथील नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी शहरात निवडणुकीचे जोरदार वातावरण तयार झाले आहे.

दरम्यान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला चिन्ह मिळाल्यानंतर हा पक्ष प्रथमच कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीला सामोरा जाणार आहे. त्यामुळे स्वाभिमान पक्षाकडून या निवडणुकीत मोठी ताकद पणाला लावली जाणार आहे. त्याला टक्‍कर देण्यासाठी शिवसेना पक्षाने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कणकवलीत आता तिहेरी लढत पहायला मिळणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS