नागपूर – विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात दुस-या दिवशीही विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शेतमालाचे पडलेले भाव, शेतकरी आत्महत्या, बोंडअळीमुळे उद्धवस्त झालेला कापूस उत्पादक शेतकरी, महागाई अशा विविध मागण्यांवरुन विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. विधीमंडळाच्या पाय-यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु मेहंगा तेल, कापसाला लागली बोंड अळी, देशाला लागली मोदी अळी या घोषणांनी सभागृहाचा परिसर दणाणून सोडला.
दुस-या दिवसाच्या कामकाजाला सुरूवात होतात विरोधकांनी विविध मागण्यासांठी सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे सुरुवातीला सभागृह 10 मिनिटांसाठी स्थगीत करण्यात आलं होतं. 10 मिनिटानंतर विधानसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच पुन्हा विरोधकांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. कर्जमाफीच्या मुद्यावरुन विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज पुन्हा अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आलं.
COMMENTS